धुळे ः टुडे १ साठी
--
लोगो छायाचित्र ः गरजेनुसार/जागेच्या उपलब्धतेनुसार क्रिकेटचा लोगो
--
महिला क्रिकेट स्पर्धेचे गुरूवारी उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ९ : येथील गुरूव्दारा परिसरातील एसव्हीकेएम शैक्षणिक संस्थेच्या संकुलात गुरूवारपासून (ता. १२) राजमाता पद्माराजे रघुजीराव कदमबांडे महिला जिल्हा अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा २०२६ सुरू होणार आहे. ही स्पर्धा रविवारपर्यंत (ता. १५) चालेल.
धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे एसव्हीकेएम शैक्षणिक संस्था संकुलाच्या मैदानावर गुरूवारी सकाळी नऊला स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेस माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांचे सहकार्य लाभत आहे. महिला खेळाडूंना प्रोत्साहनासाठी बक्षिस दिले जाईल. स्पर्धेत सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रथम क्रमांकाला ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ५ हजार रूपये, तृतीय क्रमांकाला ३ हजार रुपये, तर चतुर्थ क्रमांकाला अकराशे रुपयांचे बक्षीस दिले जाईल. शिवाय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अशा वैयक्तिक पुरस्कारांसाठी प्रत्येकी पाचशे रुपये व सन्मानचिन्हाने गौरविले जाईल. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सकाळी दहाला कार्यकारी मंडळाची सभा या संकुलात होणार असून पदाधिकारी, सदस्यांना उपस्थितीचे आवाहन संघटनेने केले. या क्रीडा महोत्सवाचा महिला खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनने केले.