लासलगाव/चांदोरी- बालपणीच नियतीने अपूर्णतेचा शिक्का बसला; पण मनात आत्मविश्वास होता. हात नव्हता, पण प्रयत्नांना कधीही मर्यादा नव्हत्या. हे शब्द आहेत, टाकळी विंचूर (ता. निफाड) येथील वाल्मीक शंकर जाधव यांचे! जन्मत: उजव्या हाताचा पंजा नव्हता. जिद्द, मेहनत आणि अपार आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी एक नाही, तर तब्बल सात सरकारी पदे पटकावून दाखवली.