निखिल रोकडे : नाशिक- ‘तुमचं अटक वॉरंट निघालं आहे’, ‘तुमच्या नावावर ड्रग्सचं पार्सल पकडलं आहे’ अशा प्रकारचे कॉल आल्यास सावध व्हा! हे ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीचे नवीन स्वरूप आहे. नाशिकमध्ये वर्षभरात अशा प्रकारे तब्बल १६ कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, बहुतांश बळी पडलेले नागरिक उच्चशिक्षित, बँक कर्मचारी किंवा निवृत्त अधिकारी आहेत.