Nashik News : पंचवटीतील Amphitheatreची दुरवस्था; वापर होत नसल्याची नागरिकांकडून खंत

dusty amphitheater at Panchvati
dusty amphitheater at Panchvati esakal
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : पंचवटी विभागातील उद्यानात आजमितीला सहा ठिकाणी ॲम्पीथिएटर उभारण्यात आलेले आहेत. एक- दोन कार्यक्रमांचा अपवाद वगळता हे उदंड ॲम्पीथिएटर धुळखात पडून आहेत. एकट्या पंचवटीत १०५ उद्याने आहेत. त्यात अमृतवन, रामसृष्टी, थीमपार्क ही उद्याने पाच एकरापेक्षा मोठ्या जागेत विकसित करण्यात आलेली आहे. (Dilapidation of Amphitheater in Panchvati Citizens regret that it is not being used Nashik Latest Marathi News)

गोदाकाठावरील कुसुमाग्रज उद्यान आणि नवीन आडगाव नाका परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक यांच्यातही ॲम्पीथिएटर तयार करण्यात आलेले आहे. अशा या उद्यानात शेकडोंच्या संख्येने प्रेक्षक बसू शकतील, अशी व्यवस्था आहे. अशा मोकळ्या जागेत कार्यक्रम सादर करण्याची अद्याप कुणी फारशी तयार दर्शविली नाही. किंबहुना तसा प्रयत्न कुणाकडून होत नाही. उद्यानातील वापरात नसलेल्या ॲम्पीथिएटरची दुरवस्था झालेली दिसत आहे. अनेक ठिकाणी या बांधकामाला तडे गेलेले आहेत.

त्यांच्या मंचावरील तसेच प्रेक्षकांच्या बसण्याच्या जागेवरील फरशा तुटून, निखळून पडल्या आहेत. मध्यंतरी तपोवनातील रामसृष्टी उद्यानातील ॲम्पीथिएटरची दुरुस्ती करण्यात आली होती. त्याच्या निखळलेल्या फरशा काढण्यात आलेल्या आहेत. तवली डोंगरावरील अमृतवन उद्यानातील ॲम्पीथिएटरही अशीच अवस्था आहे. हिरावाडीतील थीमपार्क नुकताच खुला करण्यात आलेला असताना त्याच्याही ॲम्पीथिटरला तडे गेलेले दिसत आहेत.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

dusty amphitheater at Panchvati
Nashik Winter Update : ओझरसह परिसर गारठला; पारा 5.7 अंशावर

वापर गरजेचा

सांस्कृतिक चळवळीला वाढण्यासाठी आणि कलाकारांना वाव देण्यासाठी या ॲम्पीथिएटरचा वापर होणे गरजेचे असताना तसा प्रयत्न कुठेही होत नसल्याचे दिसते. नाटकाच्या तालमीसाठी जागा उपलब्ध होत नसल्याची तक्रारी रंगकर्मींकडून सातत्याने केल्या जातात. त्यांच्यासाठी ॲम्पीथिएटरचा चांगला पर्याय होऊ शकेल. कोरोनामुळे बंदिस्थ ठिकाणी कार्यक्रम घेण्यास अडचणी निर्माण होत असताना ॲम्पीथिएटरचा पर्याय चांगला आहे.

शिवाय पंचवटीतील मोकळ्या ठिकाणी या ॲम्पीथिएटर असल्याने तेथे छोटे कार्यक्रम घेणे शक्य आहे. रंगकर्मी प्रथमेश जाधव याने घराच्या गच्चीवर खुला रंगमंच उभारून नाट्य प्रयोग सादरीकरण्यास वाव मिळून दिला. तर दुसरीकडे असलेले ॲम्पीथिएटर वापराविना पडून असल्याची खंतही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पंचवटीत परिसरातील ॲम्पीथिएटर

गोदाकाठावरील कुसुमाग्रज उद्यान, नवीन आडगाव नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, तपोवनातील रामसृष्टी उद्यान, मखलाबादच्या तवली डोंगरावरील अमृतवन उद्यान, हिरावाडी स्नेहनगरमधील थीमपार्क, रामवाडीजवळ स्मार्टसिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा.

dusty amphitheater at Panchvati
ST Free Ride Scheme : 2 कोटीहून अधिक ज्येष्ठांनी घेतला ST बसच्या मोफत प्रवासाचा लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com