Latest Marathi News | वीजचोरी करणारा तातीर; गुन्हेगार ठरले मात्र दातीर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Dilip Datir news

Nashik : वीजचोरी करणारा तातीर; गुन्हेगार ठरले मात्र दातीर!

नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर राजकारणाची काटाकाटी कुठल्या थराला जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळाले. वीजचोरी करणाऱ्याचे आडनाव तातीर असतानादेखील पोलिसात मात्र दिलीप दातीर असे नोंदविले गेल्याने याचा मनस्ताप मनसे अध्यक्षांना भोगावा लागला.

महावितरणने पत्र देऊन चूक दुरुस्त केली असली तरी दातीर यांचा राजकारणातून पत्ता कट करण्यासाठी जाणून बुजून ‘ध चा मा’ केल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात आहे. (dilip datir name instead dilip tatir misplaced in case of electricity theft Nashik Latest Marathi News)

नाशिक तालुक्यातील गौळाणे शिवारात महावितरण कंपनीने 24 लाख रुपयांची वीज चोरी पकडली. ज्या व्यक्तीच्या नावावर वीज मीटर होते, त्या व्यक्तीचे नाव दिलीप तातीर असताना पोलिसांकडे तक्रार देताना त्याऐवजी दातीर असे नाव तक्रारीत टाकण्यात आले. नाशिक शहरात दिलीप दातीर नावाचे तीन व्यक्ती आहे. यातील एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहे.

त्यामुळे मनसे शहराध्यक्षांना अनेकांनी भ्रमणध्वनीवरून कॉल करत प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावरून दिलीप दातीर यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तो मी नव्हेच, असे सांगताना दातीर यांच्या नाकीनऊ आले. पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार वृत्तपत्रांमध्ये चोरीचे वृत्त छापून आले.

हेही वाचा: Political News : माजी आमदारांसह जुने शिवसैनिक शिंदे गटात!

मनस्तापाच्या या मोठ्या प्रकारानंतर दातीर यांनी दुसऱ्या दिवशी महावितरण कंपनीत धाव घेत सर्व प्रकारची माहिती दिली. महावितरण कंपनीलादेखील चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी दातीर यांना पत्र देत वीजचोरी करणाऱ्या व्यक्तीचे दिलीप तातीर, असे नाव असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला. मात्र यानिमित्त राजकारणातील काटाकाटीदेखील समोर आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दातीर हे मनसेचे अध्यक्ष असून, विधानसभा निवडणूकदेखील लढले आहे. महापालिका निवडणुकीत श्री व सौ. दातीर दोघेही उभे राहणार आहे. दातीर यांच्या राजकीय कारकीर्दीचा चढता आलेख विरोधी पक्ष, स्वपक्षातदेखील अडचणीचा ठरत असल्याने त्यातून ‘ध चा मा’ झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: Nashik : पिंपळगांव टोल प्लाझावर 2 महिलांमध्ये Freestyle

Web Title: Dilip Datir Name Instead Dilip Tatir Misplaced In Case Of Electricity Theft Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..