नाशिकच्या दिलीप गावितची ''सुवर्ण'' धाव

नाशिकच्या दिलीप गावितची ''सुवर्ण'' धाव
Published on: 
नाशिकच्या दिलीप गावितची ‘सुवर्ण’ धाव आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने पार केला ५० पदकांचा टप्पा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : नागोया (जपान) येथे सुरू असलेल्‍या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंचा पदकांचा झंझावात कायम असून, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बुधवारी (ता. २१) चमकदार कामगिरी केली. सांगलीच्या सचिन खिलारीच्या यशानंतर नाशिकचा धावपटू दिलीप गावित याने पुरुषांच्या १०० मीटर टी-४७ प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्रासह देशाची मान उंचावली. दिलीपने अवघ्या १०.६९ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत अव्वल स्थान मिळवले. याच शर्यतीत भारताच्या मोहम्मद मोर्सिंगनाकथ याने १०.७२ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले, तर चीनच्या खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दुर्गम आदिवासी भागातून संघर्ष करत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा तिरंगा फडकवणाऱ्या नाशिकच्या दिलीप गावितने पुन्‍हा एकदा लक्षवेधी कामगिरी केली आहे. यापूर्वी त्‍याने पॅरा राष्ट्रकुल स्‍पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकताना यशाला गवसणी घातली होती. १८ ते २४ ऑक्‍टोबर या कालावधीत होत असलेल्‍या या स्‍पर्धेत विविध गटांतून भरीव कामगिरी करतांना पदकांची लयलूट केली आहे. भारताच्‍या खेळाडूंनी एकूण ५९ पदके जिंकली असून, पदक तालिकेत चौथ्या स्‍थानी आहे. १४ सुवर्ण, २१ रौप्‍य आणि २४ कांस्‍यपदक जिंकताना भारतीय खेळाडूंनी स्‍पर्धेत छाप सोडली. दरम्‍यान, दिलीप गावितने ही स्‍पर्धा १०.६९ सेकंदात पूर्ण करताना सुवर्णपदक पटकावले. भारताच्‍या मोहम्‍मदने १०.७२ सेकंद वेळेसह द्वितीय क्रमांकासह रौप्‍यपदक जिंकले. चीनच्‍या श्री कांगजून याने १०.८० सेकंद अशी वेळ नोंदवत तृतीय क्रमांकासह कांस्‍यपदक जिंकले. तर यजमान जपानचा धावपटू इशिदा ककेरू १०.८७ सेकंद वेळ नोंदवत चौथ्या स्‍थानी होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com