प्रशासनाची बेपर्वाई! निधीअभावी रखडलेलं काम, विहिरीचा कठडा उंच होता पण रस्ता बांधताना भरावात बुजला

Dindori Accident News दिंडोरीत रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत वाहन कोसळून एकाच कुटुंबातील नऊ निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर प्रशासनाने काही तासांत विहीर बुजवून कर्तव्य पार पाडलं.
Road Work Lapse Behind Fatal Mishap

Road Work Lapse Behind Fatal Mishap

Esakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा, वणी, ता. ५ : रस्ता म्हणजे प्रगतीचा मार्ग मानला जातो; मात्र दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर भागात हाच रस्ता मृत्यूचा सापळा ठरला. रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत वाहन कोसळून एकाच कुटुंबातील नऊ निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर प्रशासनाने काही तासांत विहीर बुजवून आपले ‘कर्तव्य’ पार पाडल्याचा दिखावा केला; मात्र हा प्रश्न अनुत्तरितच राहतो हेच काम आधी का झाले नाही? ही घटना नैसर्गिक नसून सरळसरळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. Dindori tragedy raises questions on safety as well boundary got buried during construction

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com