Illegal Liquor and Matka Thrive in Dindori Taluka : दिंडोरी तालुक्यात अवैध दारूविक्री, गुटखातस्करी आणि मटक्याविरोधात कारवाई केल्याचा पोलिसांचा दावा; मात्र मुख्य आरोपींना संरक्षण मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी.
लखमापूर: गुजरातच्या सीमेजवळ असलेल्या आणि औद्योगीकरण व शेतीमुळे परप्रांतीयांची संख्या वाढलेल्या दिंडोरी तालुक्यात अवैध दारूविक्री, गुटखातस्करी आणि खुलेआम मटका यामुळे तालुक्यात गुन्हेगारी फोफावत चालली आहे.