लखमापूर, वणी- दिंडोरी तालुक्यात ठिकठिकाणी बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, कोचरगाव येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तरुणासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दुसरीकडे वनारवाडी गावालगत धामण नदीजवळ लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (ता. १४) एक मादी बिबट्या जेरबंद झाला. त्यास वनरक्षकांनी ताब्यात घेतले आहे. या परिसरात दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद झाले.