Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी मतदारसंघात एकमेव महिलेने घातली खासदारकीला गवसणी

Dindori Lok Sabha Constituency : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मालेगाव लोकसभेची पहिली निवडणुक सन १९५१ मध्ये झाली.
Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituencyesakal

Dindori Lok Sabha Constituency : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मालेगाव लोकसभेची पहिली निवडणुक सन १९५१ मध्ये झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे ७२ वर्षांच्या कालावधीत पूर्वीचा मालेगाव व आताच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केवळ चार महिलांनी उमेदवारी केली. यात, सन २०१९ मध्ये प्रथमच भाजपकडून रिंगणात उतरलेल्या डॉ. भारती पवार यांना मतदारसंघाच्या तसेच नाशिक जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार होण्याची संधी मिळाली. (Dindori Lok Sabha Constituency is only woman contesting for MP )

पहिल्या यशानंतर डॉ. पवार यांना थेट केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाले. पूर्वीच्या मालेगाव तर, आताच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या (सन २००११ च्या जनगणनेनुसार १८ लाख ३० हजार ८७३) यात महिला मतदारांची संख्या ही ८ लाख ८१ हजार १८ आहे. परंतु, मतदारसंघात महिलांना हवे तेवढे प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. सन १९५२ पासून आतापर्यंत १७ लोकसभा निवडणुका झाल्या आहेत.

पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र, पक्षाने महिला उमेदवारास एकही संधी दिली नाही. मालेगाव मतदारसंघातून स्वातंत्र्यसेनानी शांताबाई दाणी यांनी १९६२ मध्ये मालेगावला रिपाईकडून निवडणुक लढवली होती. मात्र, त्यांना यश मिळालेले नव्हते. त्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसने सन २०१४ मध्ये माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले होते. मात्र, त्यावेळी भाजपचे हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता.

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने डॉ. पवार यांची उमेदवारी कापली. त्यावेळी भाजपने डॉ. पवार यांना उमेदवारी देत रिंगणात उतरविले. यात डॉ. पवार यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार धनराज महाले यांचा पराभव केला. डॉ. पवार या मतदारसंघातून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घेऊन दिल्लीत पोहचणाऱ्या पहिल्या खासदार ठरल्या. सन २०२४ च्या निवडणुकीत भाजपने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना रिंगणात उतरविले आहे. (Nashik Political News)

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha 2024: दिंडोरीमध्ये जातीय समीकरणे निर्णायक; भारती पवार पुन्हा गड राखणार?

जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार

नाशिक लोकसभा मतदारसंघातूनही आजवर महिला खासदार झालेल्या नसल्याने डॉ. भारती पवार ह्या जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार ठरल्या. डॉ. पवार यांना सन २०२१ च्या केंद्रीय मंत्रीमंडळात आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पहिल्या महिला खासदार व केंद्रिय राज्यमंत्री होण्याचे दोन्ही मान त्यांना मिळाले आहेत.

मालेगावमधून या महिलांनी लढविली निवडणूक

महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याच्या उद्देशाने नारी शक्ती वंदन कायदा आणण्यात आला. मात्र, राजकीय पक्षांनी दिंडोरी मतदारसंघात महिलांना संधी दिलेली नाही. स्वातंत्र्यसेनानी शांताबाई दाणी यांनी १९६२ मध्ये मालेगाव मतदारसंघातून रिपांइकडून निवडणुक लढविली होती.

यात त्यांनी ५७ हजार ४२८ (१९.६० टक्के) मते घेतली होती. सन १९९१ मध्ये कुसुमताई भिवराज सोनवणे या एलकेडीकडून रिंगणात उतरल्या होत्या. त्यावेळी त्यांना ७०९ मते (०.१८ टक्के) मिळाली होती. तर, सन १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत अमृता काशिनाथ गायकवाड यांनी अपक्ष निवडणुक लढविली होती. त्यांना २२३ मते मिळाली होती.

दिंडोरीतून डॉ. पवार दोनदा रिंगणात

सन २००८ पासून नव्याने अस्तित्वात आलेल्या दिंडोरी मतदारसंघात सन २०१४ मध्ये राष्ट्रवादीकडून डॉ. भारती पवार यांनी निवडणुक लढविली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. सन २०१९ च्या निवडणुकीत त्या भाजपकडून निवडणुक लढवत विजयी झाल्या होत्या. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात डॉ. पवार यांनीच दोनदा निवडणुक लढविलेली आहे.

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency: माकपच्या भूमिकेबाबत पवारांशी चर्चेअंती तोडगा काढू : पाटील; जे. पी. गावित मात्र उमेदवारीवर ठाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com