Dindori Lok Sabha Election Result
Dindori Lok Sabha Election Resultesakal

Dindori Lok Sabha Election 2024 Result : तिसरी नापास ‘सरांना’ 1 लाख मतांचे दान!

Nashik News : एकलहरे गावच्या बाबू सदू भगरे या अपक्ष उमेदवाराने २६ व्या फेरीअखेर एक लाख तीन हजार ६३२ मते मिळवत सर्वांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले.

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नाशिक लोकसभा मतदारसंघातील एकलहरे गावच्या बाबू सदू भगरे या अपक्ष उमेदवाराने २६ व्या फेरीअखेर एक लाख तीन हजार ६३२ मते मिळवत सर्वांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. तिसरी नापास ‘सरांना’ मतांचे भरभरून दान मिळाले असले तरी त्या पाठीमागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. (Dindori Lok Sabha Election 2024 Result)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात या वेळी ‘काँटे की टक्कर’ होत असल्याने महायुती व महाविकास आघाडीत सरळ सरळ लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना आव्हान देण्यासाठी बाबू सदू भगरे यांना अपक्ष उमेदवारी देत दिल्लीत पाठविण्याची तयारी केली गेली.

हा रडीचा डाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला होता. अखेर रडीचा डाव हाणून पाडण्यात भास्कर भगरे यशस्वी झाले. मात्र, नामसाधर्म्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराला चितपट करण्याची खेळी अयशस्वी झाल्याने विरोधकांचे मनसुबे उधळले आहेत. (latest marathi news)

Dindori Lok Sabha Election Result
Dindori Lok Sabha Election Result : नाशिकच्या आधी दिंडोरीचा उडणार गुलाल; दिंडोरीचा निकाल दुपारी दोनपर्यंत

‘हात कुणाचा?’

आपल्याला निशाणी काय मिळाली, हे देखील माहीत नसलेल्या बाबू भगरे यांनी अपक्ष उमेदवारी केली. अनामत रक्कम किती, प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, याची यत्किंचितही माहिती नसलेल्या भगरे यांना एक लाख तीन हजार ६३२ मते पडतात. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमागे अप्रत्यक्ष कोणाचा हात आहे का, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

Dindori Lok Sabha Election Result
Dindori Constituency Lok Sabha Election Result : भास्कर भगरे ठरले जायंट किलर! भाजपच्या भारती पवार मोठ्या फरकाने पराभूत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com