वणी, लखमापूर - दिंडोरी तालुक्यात मे महिन्याच्या जवळपास पधंरा दिवस कमी जास्त प्रमाणात झालेला अवकाळू पाऊस तसेच जुनमधील मान्सुन पूर्व व गेल्या दहा दिवसांपासून सक्रीय झालेल्या मान्सुन पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी वाढून नदी, नाले वाहून लागले आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील सहाही धरणांत पाण्याची पातळीत मोठी वाढ झाली आहे.