

Nashik Dindori accident kills 9 from same family
esakal
Nashik car falls into well accident : नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावावर शोककळा पसरवणाऱ्या भीषण अपघातात मृतांची नावे समोर आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शुक्रवारी रात्री दिंडोरी शहरात खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनावरून परतत असताना विद्यार्थ्यांसह पालकांची कार उघड्या विहिरीत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.