दिंडोरीवर पुन्हा शोककळा! चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, तर झोक्याचा फास लागून एकाचा अंत

Nashik News मोहाडी येथील दोन आते-मामेभाऊ आणि परमोरी येथील दोन चिमुरडे असा चौघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. तर झोक्याचा फास बसून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
Dindori Tragedy Claims Five Young Lives

Dindori Tragedy Claims Five Young Lives

Esakal

Updated on

लखमापूर/मोहाडी, ता. ७ : दिंडोरी तालुक्यात कार विहिरीत कोसळून नऊ जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. ७) तालुक्यावर पुन्हा शोककळा पसरली. मोहाडी येथील दोन आते-मामेभाऊ आणि परमोरी येथील दोन चिमुरडे असा चौघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत गळ्याला झोक्याचा फास बसून कादवा म्हाळुंगी येथील १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनांनी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आठवड्याच्या आत तालुक्यातील अकरा मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com