Nashik News: विहीर बुजविण्याचे निर्देश; मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख; मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे यांची घटनास्थळी भेट; चौकशीचे आदेश; विहीरमालकावर गुन्हा दाखल

Government and Official Response: दिंडोरीतील विहिरीत झालेल्या अपघातानंतर मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर; प्रशासनाने विहीर बुजविण्याचे आदेश दिले. अपघाताच्या चौकशीसाठी तातडीने कारवाई सुरू.
Nashik News

Nashik News

esakal

Updated on

वणी: दिंडोरी येथे कार विहिरीत कोसळून सहा शालेय विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (ता. ४) घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातास कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com