Grape Crop
sakal
लखमापूर: दिंडोरी तालुक्यात सप्टेंबरच्या शेवटी द्राक्षबागांची छाटणी केलेल्या बागांमध्ये काडीवर एकही घड निघालेला नसल्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. सतत पाच महिने पडणारा पाऊस आणि अपुरा सूर्यप्रकाश यामुळे द्राक्षवेलींमध्ये अपेक्षित गर्भधारणाच झाली नसल्यामुळे बागा अंगावर पोसण्याची वेळ आली आहे.