नाशिक- दहावीनंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेतील पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाचा प्रतिसाद वाढता आहे. नाशिक विभागात प्रवेशक्षमतेच्या तुलनेत नोंदणी केलेल्या प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. बुधवारी (ता. २) तात्पुरती गुणवत्तायादी प्रसिद्ध झाली. तरी शुक्रवार (ता. ४)पर्यंत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे.