Diploma Course Admission : डिप्‍लोमा प्रवेश नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत; जाणुन घ्या प्रवेश वेळापत्रक..

Diploma admission
Diploma admission esakal

Nashik News : दहावीच्‍या निकालाची प्रतीक्षा संपलेली असताना, आता पुढील शिक्षणाचे वेध विद्यार्थ्यांना लागले आहे. दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेतील पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली आहे. (Diploma course admission registration deadline till 21st june nashik news)

त्‍यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी २१ जूनपर्यंत मुदत दिलेली आहे. यानंतरच्‍या टप्प्‍यात जुलै महिन्‍यात प्रत्‍यक्ष कॅप राउंडच्‍या प्रक्रियेतून प्रवेश निश्‍चित केले जाणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता तीन वर्ष कालावधीच्‍या पूर्णवेळ पोस्‍ट एसएससी डिप्‍लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश दिले जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्‍या सर्वात महत्त्‍वाच्‍या टप्प्‍यात विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून नोंदणी करायची आहे.

यानंतर कागदपत्रांच्‍या स्‍कॅन छायांकित प्रती अपलोड तसेच, कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी दोन पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्‍ध असणार आहेत. ई-स्‍क्रुटीनी या पद्धतीतून विद्यार्थी संगणक, स्‍मार्टफोनद्वारे अर्ज भरतील, सबमिट करतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Diploma admission
Admission 2022- 23 : हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसीच्या Diploma प्रवेशाला मुदतवाढ

अर्जाच्‍या पडताळणीसाठी व निश्‍चितीसाठी विद्यार्थ्यांना कोठेही प्रत्‍यक्ष जाण्याची आवश्‍यकता नसेल. तर प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी या दुसऱ्या पर्यायाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र नजीकच्‍या सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

सध्याचे प्रवेश वेळापत्रक असे :

ऑनलाइन नोंदणी, अर्ज छाननी---------२१ जूनपर्यंत

स्‍क्रुटीनीतून कागदपत्र पडताळणी-------२१ जूनपर्यंत

तात्‍पुरत्‍या गुणवत्ता यादीची प्रसिद्धी------२३ जून

यादीसंदर्भात तक्रार नोंदविण्याची मुदत---२४ ते २७ जून

अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी--------२९ जून

"पदविका शिक्षणक्रमातून चांगले करिअर घडविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्‍ध आहे. ऑनलाइन नोंदणी केल्‍यानंतर विद्यार्थ्यांनी आपला लॉगइन आयडी व पासवर्ड कुठले तंत्रनिकेतन किंवा सायबर कॅफे चालकास देऊ नये. गोपनीयरित्‍या माहिती जतन करत फसवणूक टाळावी. वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावे." - डी. पी. नाठे, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय.

Diploma admission
SSC Result 2023 : राज्यात दहावीचा निकाल आज दुपारी 1ला; या संकेतस्थळावर विषयनिहाय गुणांची माहिती मिळणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com