Nashik News : नैताळे येथे गणेश मूर्तीची विटंबना- संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation News

Nashik News : नैताळे येथे गणेश मूर्तीची विटंबना- संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

नैताळे : नाशिक औरंगाबाद या महामार्गावर असलेल्या नैताळे येथे श्री मतोबा महाराज यात्रा सुरू आहे.आज मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी गावाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गणेश मंदिरात जाऊन गणेश मूर्तीची विटंबना केली आहेत.

ही बाब ग्रामस्थांच्या सकाळी लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी नाशिक औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता निफाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पटारे आपल्या फौज फाट्यासह आंदोलन स्थळी तातडीने दाखल झाले. (Disgrace of Ganesha idol Naitale Block way of angry villagers Rasta Roko protest called off after Niphad promised police action Nashik News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Jalgaon News : महापालिका करणार सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण; वैयक्तिक शौचालय अनुदान

संतप्त ग्रामस्थांना अज्ञात समाजकंटकविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले व रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली तसेच गावात यात्रा चालू असल्याने शांतता राखण्याची विनंती केली.

यानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर संतप्त ग्रामस्थांनी आपले रास्ता रोको आंदोलन तातडीने मागे घेतले.त्यानंतर निफाड पोलीस समाजकंटक याचा शोध घेत आहेत नैताळे ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Nashik News: नाशिककरांवर करवाढ अटळ राहण्याची शक्यता! दप्तरी दाखल ठरावावरून हायकोर्टाची राज्य शासनाला विचारणा

टॅग्स :Nashikagitation news