Latest Marathi News | 'अधिकृत टपरीधारकांना न्याय द्यावा’ विस्थापित व्यावसायिकांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj Pagar, Bhalchandra Kothavade, Dada Sonje giving a statement to Police Sub-Inspector Mahesh Nikam against encroachment

Malegaon : 'अधिकृत टपरीधारकांना न्याय द्यावा’ विस्थापित व्यावसायिकांची मागणी

कळवण : शहरातील मेनरोडवरील अतिक्रमण रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली २००५ साली काढण्यात आले. या वेळी अतिक्रमणधारक व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, आजमितीला १७ वर्ष पूर्ण होऊनही विस्थापित व्यावसायिकांचा प्रश्‍न अनुत्तरित असून, व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत प्रशासनास निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे. (Displaced professionals demand justice to official tapri holder)

याबाबत माहिती अशी की, २००५ साली मेनरोड येथील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली काढले. संबंधित व्यावसायिकांनी त्यावेळी सामोपचाराची भूमिका घेत प्रशासनास स्वतःहून अतिक्रमण काढून घेऊन सहकार्य केले. या वेळी या व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्याचे मान्य करण्यात आले होते.

परंतु, १७ वर्षे उलटूनही या व्यावसायिकांचा कोणताही विचार झालेला नाही. सदर व्यावसायिक १९७१ सालापासून या जागेत सलून, किराणा, चहा टपरी असे छोटे व्यवसाय करीत होते. याबाबत ग्रामपालिकेला करभरणा केला असून, तशा पावत्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत. २००५ साली अधिकृत टपरीधारकांना तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन हवेत विरले आहे.

हेही वाचा: Malegaon : कोजागिरी निमित्त कावडधारकांचे आगमन, सामाजिक एकतेची परंपरा!

मात्र, याच जागेचा कर भरणारे बेहाल, तर कोणतीही अधिकृत पावती नसणारे इतर व्यावसायिक या ठिकाणी बिनबोभाट व्यवसाय करीत आहे. यामुळे स्थानिक व अधिकृत टपरीधारकांवरील अन्याय दूर व्हावा, अशी मागणी भालचंद्र कोठावदे, प्रकाश कालवडीया, मनोज पगार यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनाच्या प्रति प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Nashik Bus Fire Accident : क्षणात सुटली आजीची साथ; चिमुकल्या नातवांची नजर शोधत होती आजीला

टॅग्स :Malegaon