Nashik Bus Fire Accident : क्षणात सुटली आजीची साथ; चिमुकल्या नातवांची नजर शोधत होती आजीला

Nashik bus fire
Nashik bus fireesakal

नाशिक: मुलीची मुलगी अन्‌ मुलाच्या दोन मुलांना सोबतीला घेऊन आजी बीवी परतूर येथून चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये मुंबईला येण्यासाठी बसल्या. बसमध्ये जागा नव्हती तरी त्यांना बसमध्ये घेतले. बसायला जागा नसल्याने तिन्ही नातवांसह आजी दोन सिटांमधील मोकळ्या जागेत बसल्या. पण पहाटे साखर झोपेत असतानाच आजी अन्‌ तीन वर्षांच्या नातीवर काळाने जणू घालाच घातला.

तर मुलीची मुलगी व मुलाचा मुलगा यातून बचावले असले तरी रुग्णालयातही त्यांची नजर त्यांच्या लाडक्या आजीला शोधत होती. हे पाहून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या नर्सेसचेही डोळे पाणावले.

लक्ष्मीबाई मुधोळकर (वय ५५, रा. विधी, ता. लोणार, जि. बुलडाणा) या मुंबईमध्ये एका कंपनीत पॅकेजिंगचे काम करतात. तर त्यांचे जावई व मुलगी, मुलगा व सून हे ऊसतोडीच्या कामावर गेले होते. त्यामुळे मुलीची मुलगी पायल रमेश शिंदे (९) आणि मुलाचा मुलगा चेतन (४) व मुलगी कल्याणी (३) यांना त्या सांभाळण्यासाठी मुंबईला निघाल्या होत्या.(Nashik Bus Accident Little Girl lossed her Grandmother Nashik Bus Accident News)

Nashik bus fire
Nashik Bus Accident : "डोळ्यादेखत लोकांचा कोळसा होत होता, मी 2-3 जणांनाच वाचवू शकलो"

शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी त्या यवतमाळवरून मुंबईला निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये बसल्या. बसमध्ये बसण्यासाठी जागा नव्हती, तरीही बसचालकाने त्यांना बसमध्ये घेतले. त्यामुळे त्या बसमध्ये दोन आसनाच्या रांगेमध्ये असलेल्या जागेत नातवांना घेऊन बसल्या. नाशिक येण्यापूर्वी भल्या पहाटे नातवांसह गाढ साखर झोपेत असताना अचानक बसला अपघात झाला आणि काही कळायच्या आत आजी अन्‌ नातवांची ताटातूट झाली.

बसमधील एका महिलेने पायल आणि चेतन या दोघांना खिडकी फोडून बाहेर टाकले. पण त्यांची आजी अन्‌ नात कल्याणी बसला लागलेल्या आगीच्या लोळात सापडले. बस विझविल्यानंतरही त्यांचे मृतदेह हाती लागले नव्हते. पंचनामा केल्यानंतर जळालेल्या बसचा सांगडा क्रेनने हलविण्यात आला. त्या वेळी जळालेल्या सिटांच्या सांगाड्याखाली आजी लक्ष्मीबाई अन्‌ चिमुरडी कल्याणी या दोघांचे मृतदेह कोळसा झालेल्या स्थितीत हाती लागले.

दरम्यान, पायल अन्‌ चेतन यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतरही ते आजीची आसुसलेल्या नजरेने वाट पाहत होते. जणू त्यांची आजी येईल अन्‌ त्यांना कवटाळून घेऊन जाईल, अशीच भावना पायलचे डोळे व्यक्त करीत होते.

Nashik bus fire
Nashik Bus Fire: स्फोट झाला अन् प्रवासी चेंडूगत उडाले...

''झोपेत असतानाच एकदम आवाज झाला अन्‌ पाचव्या सेकंदाला बसने पेट घेतला. तेव्हा घाबरलो. तत्काळ खिडकीची काच फोडली अन्‌ पत्नीला बाहेर फेकले. त्यानंतर उडी घेतली. यात पायाला, हाताला दुखापत झाली आहे. डोळ्यांसमोर काही प्रवासी अन्‌ बस जळत होती. अर्धा तासाने रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णालयात दाखल झालो.'' - सचिन किसन जाधव, जखमी प्रवासी

''आईबरोबर मुंबईला निघाले होते. बसमध्ये जागा नव्हती. त्यामुळे आम्ही खाली बसलेलो होतो. मी झोपेतच होते तर मोठा आवाज झाला. बसमध्ये सारा धूर पसरला होता. आम्ही खूपच घाबरलो. आईने कसलाही विचार न करता मला एका मोठ्या खिडकीतून बाहेर फेकले अन्‌ काही वेळात तिनेही बाहेर उडी घेतली. त्यानंतर काही वेळातच बसला मोठी आग लागली. आम्ही घाबरून एका दुकानाच्या मागे लपलो.'' - किरण चौगुले, जखमी चिमुकली

Nashik bus fire
Nashik Bus Fire: ''जाग आली अन् बघतो तर..."; बसमधील छोट्या आर्यनचा थरारक अनुभव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com