Nashik News : जुन्या मूर्तीचे विसर्जन, नवीन मूर्तीची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naitale: Rasta Roko protest by angry villagers after desecration of Ganesha idol here

Nashik News : जुन्या मूर्तीचे विसर्जन, नवीन मूर्तीची स्थापना

नैताळे : येथे श्री मतोबा महाराज यात्रा सुरू असून आज (ता.१४) मध्यरात्रीच्या दरम्यान समाजकंटकांनी गावाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गणेश मंदिरातील मूर्तीची विटंबना केली. ही बाब सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी नाशिक औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता निफाडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद पटारे फौजफाट्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले. संतप्त ग्रामस्थांना समाजकंटकविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले व रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची व गावात यात्रा चालू असल्याने शांतता राखण्याची विनंती केली.

यानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनीही समंजसपणाची भूमिका घेत आंदोलन लगेच मागे घेतले. ग्रामस्थांनी तातडीने जुन्या मूर्तीचे गंगेत विसर्जन करून नवीन मूर्तीची स्थापना केली आहे. (Dissolution of old idol of ganesh murti installation of new idol of ganesh Police assures villagers of roadblock action after vandalism in Naitale Nashik News)

हेही वाचा: Jalgaon News : लम्पीच्या नुकसानीपोटी पशुमालकांना 4 कोटी 78 लाख; पशुधन आठवडेबाजार पूर्ववत

नैताळे येथे श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे, त्यामुळे संपूर्ण महामार्गालगत विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटले आहेत. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात समाजकंटकाने मध्यरात्रीच्या दरम्यान गणेश मंदिरातील मूर्तीची विटंबना केली. घटना सकाळी समजताच ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी नाशिक औरंगाबाद या महामार्गावर सकाळी साडेआठला रास्ता रोको आंदोलन केले.

यामुळे दोन्ही बाजूंनी एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या होत्या. घटनेची माहिती निफाड पोलिसांना मिळताच सहाय्यक निरीक्षक पटारे, एकनाथ ढोबळे, विलास बिडगर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर फौजफाटा नैताळे येथे हजर झाला. रास्तोरोको सुरू असताना सर्व आंदोलनकर्त्यांना निफाड पोलिसांकडून विनंती करण्यात आली. अज्ञात समाजकंटकाचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यात येईल, मात्र आंदोलन मागे घ्यावे.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Nashik News : महापालिकेच्या वाहनांना डिझेल पुरविण्यास नकार

गावातील यात्रा सुरळीत व कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता सुरू राहावे याकरीता नैताळे ग्रामस्थांनी समंजसपणा दाखवित आंदोलन मागे घेतले. ग्रामस्थांनी तातडीने गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेत तातडीने नाशिक येथून नवीन मूर्ती आणून जुन्या मूर्तीचे गंगेत विसर्जन करण्यात आले. नवीन मूर्तीचे मंत्रोच्चारात व गणेशाच्या जयघोषात स्थापना करण्यात आली. सायंकाळी पोलिस उपाधीक्षक सोमनाथ तांबे यांनी नैताळे येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

"झालेली घटना अतिशय निंदनीय आहे. अज्ञात समाजकंटकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नक्कीच कारवाई करण्यात येईल."

- आनंद पटारे, सहा. पोलिस निरीक्षक, निफाड.

"नैताळेकरांचे आराध्यदैवत श्री मतोबा महाराजांची यात्रा सुरू असल्याने सर्वच ग्रामस्थांनी शांतता बाळगली. निफाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्हेगाराचा शोध घेत आहेत, तरी ग्रामस्थांनी शांतता राखावी."

- राजेंद्र बोरगुडे, सदस्य, नैताळे ग्रामपंचायत.

हेही वाचा: Nashik News :Smart Cityच्या कामांमुळे मे पर्यंत वाहतूक मार्गात बदल