Nashik News : महापालिकेच्या वाहनांना डिझेल पुरविण्यास नकार

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporationesakal

नाशिक : महापालिकेच्या २१३ वाहनांना डिझेल भरण्यासाठी पुरवठादारांनी तिसऱ्यांदा नकार दिला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध प्रक्रियेमध्ये एकही पुरवठादार पुढे आला नाही. त्यामुळे वाहनांना इंधन पुरवठा करण्यासाठी खासगी पंपांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

महापालिकेच्या ताफ्यात २१३ वाहने आहे. या वाहनांना डिझेल पुरविण्यासाठी महापालिकेने पंचवटी विभागातील भांडार विभागाच्या जागेत स्वमालकीचा पंप उभारला होता. त्या पंपावर भारत पेट्रोलियम कंपनीकडून इंधन पुरवठा होत होता. (Municipal vehicles Refusal to supply diesel Decision to fill diesel only from private pump Nashik News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Nashik Municipal Corporation
Nashik News : होळकर पुलावरील पादचारी मार्गाला भेगा

दरमहा वीस हजार लिटर डिझेलची नोंदणी भारत पेट्रोलियम कंपनीकडे महापालिकेच्या माध्यमातून होत होती. परंतु, भारत पेट्रोल कंपनीमार्फत महापालिकेला डिझेल पुरवठा करताना प्रतिलिटर १३ रुपये अधिक दराने डिझेल पुरवले जात होते. अधिकच्या दरामुळे दरवर्षी महापालिकेला ३२ लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत होता.

त्यामुळे लेखापरीक्षण विभागाने ताशेरे ओढल्यानंतर खासगी पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी दोनदा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. दोन्ही निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

११ जानेवारीपर्यंत मुदत होती, मात्र तिसऱ्या निविदा प्रक्रिलेही पुरवठादारांनी प्रतिसाद दिल्याने अखेरीस आता खासगी पंपावरूनच डिझेल भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेला डिझेल पुरवठा करताना जीएसटी व अन्य करांचा भार पुरवठादारांना सहन करावा लागेल. त्यामुळे पुरवठादारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.

Nashik Municipal Corporation
Nashik News : राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची आशिमा मित्तलांकडून झाडाझडती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com