Nashik : 4 महिन्यात 4 हजार जन्म मृत्यू दाखल्यांचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Birth & Death certificate

Nashik : 4 महिन्यात 4 हजार जन्म मृत्यू दाखल्यांचे वितरण

जुने नाशिक : आगामी शैक्षणिक वर्षानिमित्त (Education year) जन्म दाखला घेण्यासाठी नागरिकांकडून विभागीय कार्यालयामध्ये (Divisional Offices) गर्दी केली जात आहे. गेल्या चार महिन्यात पूर्व विभागीय कार्यालयात सुमारे २ हजार ७४६ जन्म दाखल्याचे वितरण झाले आहे. गेल्यावर्षी संपूर्ण वर्षभरात कोरोना (Corona) परिणामामुळे केवळ ६ हजार ४३८ दाखल्याचे वितरण झाले होते. (Distribution of 4,000 birth and death certificates in 4 months Nashik News)

कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष सर्वच कामांना ब्रेक लागला होता. २०२० मध्ये लॉकडाऊन असल्याने शाळा बंद होत्या. २०२१ मध्यापासून ऑनलाइन पद्धतीने शाळा (Online school) सुरू करण्यात आल्या. तर, काही शाळा ५० टक्के उपस्थितीत ऑफलाइनदेखील सुरू होत्या. नियमित विद्यार्थ्यांचा समावेश होता. नवीन प्रवेश झाले नसल्याने जन्म दाखल्याची आवश्यकता भासली नव्हती. यंदा मात्र सर्व काही सुरळीत असल्याने पूर्ण क्षमेतेने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यानिमित्त पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेश प्रक्रियेची सुरवात केली आहे. त्यासाठी सर्वात आवश्यक असलेले जन्म दाखला काढण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये गर्दी केली जात आहे.

पूर्व विभागीय कार्यालयात अशीच परिस्थिती बघावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे मृत्यू दाखल्याचे वितरणही मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्यावर्षी संपूर्ण वर्षभरात केवळ ६ हजार ४३८ जन्म दाखल्याचे वितरण झाले होते. तर, यंदा केवळ चार महिन्यात सुमारे २ हजार ७४६ दाखल्याचे वितरण झाले. अद्यापही दैनंदिन जन्म आणि मृत्यू दाखले प्राप्त करण्यासाठी अर्ज प्राप्त होत आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत या वर्षी सर्वाधिक दाखले वितरण होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. कोरोनाकाळात मात्र जन्म दाखल्यांपेक्षा मृत्यू दाखल्यांना अधिक मागणी होती.

असे झाले दाखल्याचे वितरण

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ वर्षात जन्म दाखल्यासाठी अर्ज ६ हजार ४३८ प्राप्त झाले होते. त्यापैकी सर्व दाखल्याचे वितरण झाले. त्या तुलनेत १ जानेवारी ते १७ मे २०२२ साडेचार महिन्यात प्राप्त अर्जांपैकी सुमारे २ हजार ७४६ दाखल्याचे वितरण करण्यात आले. विविध कारणांनी सात अर्ज प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ वर्षात मृत्यू दाखल्यासाठी ६ हजार ६ हजार ९०२ प्राप्त झाले होते. सर्व दाखले वितरित करण्यात आले.१ जानेवारी ते १७ मे २०२२ साडेचार महिन्यात मृत्यू दाखल्यासाठी १ हजार ९६१ प्राप्त झाले होते त्यापैकी सर्व दाखले वितरित झाले आहे.