
नाशिक : बागलाण तालुक्यात 47 हजार पुस्तकांचे वाटप
जुनी शेमळी (जि. नाशिक) : शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरु होत असून, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरुन केंद्रस्तरावर मोफत पाठपुस्तक वाटप करण्यात आले असून, ३९५ शाळांमध्ये ४६ हजार ९७५ विद्यार्थ्यांना दोन लाख ८१ हजार १२३ लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरित करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे यांनी दिली.
शासनाकडून तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले असून, पुस्तके केंद्र स्तरावर वितरीत करण्यात आले. तालुक्यातील २१ केंद्रातील उर्दु, खासगी अनुदानित, जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळांमध्ये पहिली ते आठवीतील ३९५ शाळांना ४६ हजार ९७५ लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन लाख ८१ हजार १२३ पुस्तके वितरित करण्यात आली. या वेळी विस्तार अधिकारी विजय पगार, कैलास पगार, विषयतज्ज्ञ योगेश आहिरे, विजय पगारे, ललित शिंदे, सचिन नांद्रे, धीरज वाणी व सर्व शिक्षा अभियान कर्मचारी उपस्थित होते.
पहिलीसाठी ५३१३, दुसरी ५ हजार, तिसरी, ५३०९, चौथी ५८२८, पाचवी ६३२४, सहावी ६१३६, सातवी ६६०८, आठवी ६४५७ अशा एकूण ४६ हजार ९७५ विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली.
''बागलाण तालुक्यातील २१ केंद्रातील जिल्हा परिषद शाळांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तक वाटप करावे व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे.'' - चित्रा देवरे, गटशिक्षणाधिकारी, बागलाण