
जिल्हा प्रशासनाची दिरंगाई निवडणुकांच्या मुळावर?
नाशिक : जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समित्यांचे गट व गणांचा प्रारूप आराखडा सादर करण्यासाठी आजचा मुहूर्त निश्चित केलेला असताना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विभागीय आयुक्तांना अहवाल सादर झाला नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्धारित वेळापत्रकानुसार निवडणुकीचे कामकाज होत नसल्याने त्याचा परिणाम निवडणुकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय राजवट सुरु झाली. निवडणुकांना ओबीसी आरक्षणाचा निर्णय कारणीभूत ठरला. 4 मे ला न्यायालयाने पंधरा दिवसात निवडणुकांसंदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा: नाशिक : ग्रामीण भागात भूगर्भातील जल पातळी वाढविणार
त्यानुसार जिल्हा परिषद (ZP),पंचायत समितीच्या गट व गण संदर्भात यापूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये तयार करण्यात आलेला आराखडा रद्द करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाने गट व गण प्रारूप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर करताना प्रारूप आराखडे मान्यतेचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिले. त्यानुसार प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम २३ मेपासून सुरु झाले.
हेही वाचा: जिल्हा नियोजनचा ५ टक्के निधी शिक्षणासाठी
२७ जूनला अंतिम प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार सोमवारी विभागीय आयुक्तांना गट व गणाचे आराखडे सादर करायचे होते. मात्र, दिरंगाईमुळे कार्यवाही झाली नाही. येत्या चार ते पाच दिवसांत आराखडा सादर केला जाणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे (Deputy Collector Nitin Gawande) यांनी दिली.
Web Title: District Administrations Delay Effect On The Elections In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..