नाशिक- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे काय झाले, असा मुद्दा कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री कोकाटे आपल्या शैलीत प्रत्युत्तर देत म्हणाले, की कर्जमाफी नाही झाली, आता मी काय करू? यावरून शेतकरी आणि कृषिमंत्र्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. पण, जिल्हा बँकेचे संस्थात्मक सल्लागार विद्याधर अनास्कर यांनी मध्यस्थी करीत शेतकऱ्यांचे समाधान केले.