
नाशिक : राज्य शासनाने यापूर्वी दोनदा दिलेल्या कर्जमाफीचा जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यामुळे ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत कर्जदारांची यादी पूर्ण झाली असून, यापुढे शासनाने जरी कर्जमाफी दिली तरी १ एप्रिल २०१९ पासून थकबाकीदारांचा विचार होईल. जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज २०१६-१७ पासून थकीत असल्याने त्यांना यापुढेही लाभ मिळणार नसल्याचे जिल्हा बँक प्रशासकांनी स्पष्ट केले आहे.