District Caste Certification Committee : जिल्ह्यात जात पडताळणी, जात प्रमाणपत्राचे वाटप

caste validity and caste certificate
caste validity and caste certificateesakal

District Caste Certification Committee : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या महिनाभराच्या कालावधीत ‘सामाजिक न्याय पर्व उपक्रमात जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने राबविलेल्या मोहिमेत जिल्ह्यातील नऊ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र तसेच, जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. (District Caste Certification Committee distribution of Caste verification caste certificate in district nashik news)

बारावी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी या कालावधीत विशेष मोहीम घेण्यात आली होती. या विशेष मोहिमेमध्ये नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून तीन हजार ६६२ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन निर्गमित करण्यात आलेले आहेत.

नाशिक जिल्ह्यातून सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पाच हजार ६९७ जात दाखले निर्गमित करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

caste validity and caste certificate
Nashik Politics: कही खुशी, कही गम! सत्तासंघर्षाच्या निकालावर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया, दावे-प्रतिदावे

ज्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे, व त्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन भरलेले नाहीत,

अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाइन अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व मूळ कागदपत्र अपलोड करून व ते अर्ज सर्व अपलोड केलेल्या मुळ कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह व मुळ शपथपत्रांसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिकच्या नागरी सुविधा केंद्र येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत जमा करावेत. जेणेकरून त्यांचे प्रकरणांवर समितीस वेळेत निर्णय घेता येतील.

caste validity and caste certificate
Shiv Sena Political Crisis : उद्धव ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाणांचं ऐकलं असतं तर, निकाल वेगळा लागला असता!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com