District Bank
sakal
नाशिक: आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नफ्यात आणण्यासाठी प्रशासनाने थेट शाखा व सेवकांवर ठेव संकलनाचे उद्दिष्ट लादले आहे. प्रत्येक सेवकाने दरमहा किमान दहा नव्या ठेवीदारांकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांची १०० दिवसांची मुदतठेव जमा करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन महिने शिल्लक असताना हे उद्दिष्ट साध्य करणे कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.