Ayush Prasad : नाशिकच्या महसूल अधिकाऱ्यांची भंबेरी! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली अचानक 'परीक्षा', उत्तरे लेखी सादर

20 Key Revenue Issues Included in Question Paper : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महसूल आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांना महसूल विषयांवरील २० प्रश्नांची लेखी उत्तरे देण्याच्या सूचनेनंतर अचानक परीक्षा वातावरण निर्माण झाले.
Ayush Prasad

Ayush Prasad

sakal 

Updated on

नाशिक: जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ९) महसूल विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूलशी संबंधित २० महत्त्वपूर्ण विषयांवर प्रश्‍न तयार करून उपस्थित प्रांताधिकारी व तहसीलदारांना ते सोडविण्यास सांगितले. त्यात संबंधित मुद्द्यांची सद्यःस्थिती, प्रलंबितता व ते मार्गी लावण्यासाठी करायच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने उत्तरे द्यायची होती. या परीक्षेचा निकाल ६ जानेवारीच्या बैठकीत घोषित केला जाणार असला, तरी ऐनवेळी हाती पेपर आल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com