Nandurbar : जनजागृती अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
जनजागृती अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

जनजागृती अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

नंदुरबार : जिल्हा परिषद नंदुरबार व युनिसेफ यांच्यातर्फे कोरोना लसीकरण जनजागृती अभियान नुकतेच राबविण्यात आले. त्यांचा प्रारंभ जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाला. जिल्हा परिषदेत झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, जिल्हा सल्लागार युनिसेफ डॉ. हर्षदा पवार तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी तसेच युनिसेफचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या जनजागृतीपर सहा वाहनामार्फत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांतील दुर्गम भागातील ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. अशा ठिकाणी आदिवासी बोलीभाषेत लसीकरणाबाबत नागरिकांचे समुपदेशन, लसीकरणाबाबत अफवा, शंकांचे निरसन ध्वनिक्षेपक आणि फलकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा उपक्रम चांगला असून, त्यामुळे लसीकरणास प्रतिसाद वाढण्यास मदत होईल, असे श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले.

loading image
go to top