Zilla Parishadsakal
नाशिक
Nashik Zilla Parishad : महिला छळ प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेतील अधिकारी रजेवर; चौकशीचा ससेमिरा सुरूच
Investigation into Harassment Complaints in District Council : रजेवर गेलेले जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी एका दिवसासाठीच हजर झाले आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा रजेवर गेले. परिणामी, प्रशासनात ‘रजा सत्र’ सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नाशिक- जिल्हा परिषदेत तीन खातेप्रमुखांची चौकशी सुरू असतानाच आता सामान्य प्रशासन विभागातील एक कनिष्ठ अधिकारीही तब्बल १५ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीच रजेवर गेलेले जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी एका दिवसासाठीच हजर झाले आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा रजेवर गेले. परिणामी, प्रशासनात ‘रजा सत्र’ सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.