Nashik News : नाशिकला मिळणार मुंबईच्या धर्तीवर आधुनिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र
District Collector Office to Host Smart DEOC Facility : नाशिकमध्ये प्रस्तावित जिल्हा आपत्कालीन केंद्रासाठी जागेच्या शोधास सुरुवात; राज्य शासनाचा निधी मंजूर, मंत्रालयाशी थेट जोडणी होणार.
नाशिक- मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्ये अद्ययावत जिल्हा आपत्कालीन केंद्र (डीईओसी) उभे राहणार आहे. राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग या केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. जिल्हा प्रशासनाने या केंद्रासाठी आता जागेची शोधाशोध सुरू केली आहे.