नाशिक- जिल्हा शासकीय रुग्णालयात बनावट दाखल्याच्या आधारे सफाई कामगाराच्या नोकरी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित व जिल्हा रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने बुधवारी (ता.२३) फेटाळून लावला आहे. दरम्यान, या प्रकरणी पाटील यांच्यावरील विभागीय चौकशीसह निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे.