सातपूर: केंद्राने विशेष योजनेंतर्गत देशातील सुमारे दीडशे औद्योगिक शहरांची निवड करून त्यांच्या शहरातील कृषीसह औद्योगिक उत्पादनात निर्यातवाढीसाठी केंद्र व राज्य सरकारने विकास आयुक्त विभागामार्फत विशेष योजनेंतर्गत प्रयत्न केले होते. त्यात नाशिक जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या निर्यातीसाठी विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील द्राक्ष व त्यापासून तयार करण्यात आलेल्या बेदाणे निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने केंद्र सरकारने नाशिक जिल्हा उद्योग केंद्राला गोल्डन पुरस्कार देऊन गौरव केला आहे.