Fund Distribution
sakal
नाशिक: जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री मिळालेले नसले तरी जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे सर्व आमदारांना समान वाटप झाले आहे. आमदारांकडून कामनिहाय याद्या मागवून त्यानुसार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याचे नियोजन सोपविण्यात आले. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील तिन्ही खासदारांना यापासून वंचित ठेवल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.