नाशिक- जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व १५ तहसील कार्यालयांच्या दफ्तर तपासणीचा निर्णय घेतला असून, यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या मोहिमेचा पहिला टप्पा सुरू झाला असून, निफाड, दिंडोरी आणि इगतपुरी तहसील कार्यालयांची तपासणी सुरू आहे. या कारवाईमुळे तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.