Nashik Rain 2025
Sakal
नाशिक: यंदा मॉन्सून शेवटच्या टप्प्यांत पोहोचला आहे. तुर्तास पावसाने उघडीप दिली असली, तरी नाशिक विभागात आतापर्यंत सरासरी ६७ टक्के पाऊस झाला. विभागातील पाचही जिल्ह्यांपैकी नाशिकमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, विभागातील २४ तालुक्यांमध्ये ५० ते ७० टक्क्यांदरम्यान पाऊस नोंदविला गेला. सात तालुक्यांत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्य झाले आहे.