संतापजनक! दिव्यांग महिलेला शिवीगाळ करत मारहाण

Divyang woman abused and beaten
Divyang woman abused and beaten esakal

अंबासन (जि.नाशिक) : येथे दिव्यांग महिलेला शिविगाळ करीत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून सदर दिव्यांग महिलेने जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी अंपग प्रहार संघटनेने केली आहे.

अपंगत्वाची केली अवहेलना

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिव्यांग महिला प्रतिभा खैरनार यांच्या आईची तब्येत ठिक नसल्याने मंगळवार (ता.११) दुपारी विचारपूस करण्यासाठी आपल्या लहान मुलीसह आईच्या घरी गेल्या होत्या. त्यानंतर परत येत असतांनाच कुठलेही कारण नसतांना महेंद्र आहिरे व पत्नी वैशाली महेंद्र आहिरे यांनी प्रतिभा यांना अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करत, 'पुन्हा इथे पाऊल ठेवले तर याद राख. तु लंगडी आहेस सायंकाळी तुझ्या घरी येऊन ठोकतेच' असा सज्जड दमही दिला. दिव्यांग महिलेची कुठलीही चूक नसतांना विनाकारण अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केल्याने त्यांनी प्रहार संघटनेचे संस्थापक तसेच राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू याच्यांकडे तक्रार केली आहे.

Divyang woman abused and beaten
संतापजनक! आरोग्य केंद्राने बाहेरचा रस्ता दाखवला; रस्त्यावरच झाली प्रसूती

याप्रकाराबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक तुषार भदाणे यांच्या मार्गदर्शनानुसार हवालदार नानासाहेब पाटिल तपास करीत आहेत. दिव्यांग महिलेवर झालेला अन्यायाबाबत अंपग प्रहार संघटनेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Divyang woman abused and beaten
जळगाव : आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांचा छळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com