धुरामुळे हवेची गुणवत्ता घसरली

धुरामुळे हवेची गुणवत्ता घसरली
Published on: 
(टुडे १ मेन फिचर) --- बातमीच्या पोटात धुराच्या लोटाचा फोटो घेणे. ------------ फटाक्यांच्या धुरामुळे घसरली हवेची गुणवत्ता निर्देशांकात १८० पट वाढ; धूर, हवेच्या स्थिरतेमुळे रुग्णांची घुसमट सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : शहरात लक्ष्मीपूजनाला कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र या आतषबाजीतून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण निर्देशांकात कमालीची वाढ झाली असून, धोक्याची पातळी ओलांडल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यावर्षी देखील दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त काल (ता. ८ नोव्हेंबर) या एकाच दिवशी हवेची गुणवत्ता खालावली आहे. यात हवेतील गारवा, हवा स्थिर असल्याने तब्बल २३० च्यावर हवेचा निर्देशांक पोचला आहे. जळगाव शहरात दरवर्षी सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान हवेतील गुणवत्ता निर्देशांकात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील रस्ते दुरुस्ती, कॉक्रिटीकरणामुळे उडणारी धूळ, पावसाळ्यात वाहनांमुळे रस्त्याच्या कडेला वा अन्य ठिकाणी चिखल साचून कोरडा झाल्यानंतर उडणारी धूळ आदी कारणांमुळे हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. मात्र यंदा कमी पर्जन्यमान असून बऱ्याच ठिकाणी रस्ते कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक स्थिर उत्तम वा ठिक असा ३५ ते ४९ असा नोंदवला गेला होता. असले तरी रविवारी (ता.८) जळगाव शहरासह जिल्ह्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक साधारणपणे १५३ ते २३० च्या दरम्यान नोंदवला गेला असून हवा ''मध्यम'' ते ''अत्यंत वाईट किंवा खराब'' श्रेणीत पोहोचला आहे. चौकट नागरिकांनी घ्यावी काळजी जिल्ह्यात यंदा गुलाबी थंडीचे आगमन उशिरानेच झाले आहे. यात गेल्या दोन, तीन दिवसापासून तापमान कमाल ३४ ते ३५ तर रात्रीच्या तापमानात बरीच घट झाली असून, सर्वसाधारणपणे किमान १५ ते १७ अंश नोंदविले गेले आहे. थंड वातावरण आणि हवेच्या स्थिरतेमुळे (हवेचा कमी वेग) दिवाळीत फटाक्यांचा धूर हवेतच रेंगाळल्याने हवेचा गुणवत्ता निर्देशांक अचानक वाढून ‘एक्यूआय’ २३० च्या वर जाणे हे आरोग्यासाठी, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचा त्रास (अस्थमा) असलेल्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरणे, आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. धूर, प्रदूषित हवा घरात येऊ नये, यासाठी घराचे दरवाजे-खिडक्या बंद ठेवणे हितकारक असल्याचे हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे. ---------- कोट... रविवारी (ता.८) रात्री फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात तब्बल २३० पर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एक, दोन दिवसांत हवेची गुणवत्ता पुन्हा स्थिर होऊन किमान ५० ते ५५ ‘एक्यूआय३ दरम्यान येण्याची शक्यता आहे. - करणसिंग राजपूत, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.