सूचना : मेनबातमीच्या खालीच घ्यावी... अजून एक बातमी देत आहे...अशीच
लोगो : कर्तव्याची दिवाळी
––––––
NSK26H34776
जळगाव : दिवाळीच्या दिवशी कर्तव्य बजावताना बसचालक.
–––––––––
दिवाळीच्या दिवशीही एसटी कर्मचारी कर्तव्यावर!
--------
अन्य गावांत मुक्काम; सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुकर करण्याची सेवा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : सर्वत्र कुटुंबीयांसोबत दिवाळी उत्साहात साजरी केली जात असताना एसटी कर्मचाऱ्यांसाठी मात्र, दिवाळीचा दिवसदेखील नेहमीप्रमाणे कर्तव्याचा राहिला. दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या व नातेवाइकांना भेटण्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची दिवाळी घरापासून दूर, बसस्थानकावर किंवा प्रवासातच साजरी झाली.
दिवाळी हा कुटुंबीयांसोबत आनंद वाटून घेण्याचा सण. या काळात नोकरी, व्यवसाय व शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेले आपल्या गावी परततात. त्यामुळे एसटी बससेवेवर प्रवाशांचा मोठा भार असतो. प्रवाशांना सुरक्षित व वेळेत प्रवास करता यावा, यासाठी चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, वाहतूक नियंत्रक व आगारातील अन्य कर्मचारी दिवाळीच्या दिवशीही आपली जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे बस कर्मचाऱ्यांचा आजचा दिवाळी उत्सवाचा दिवसही नेहमीसारखाच राहिला.
दिवाळी रस्त्यावर
एसटी महामंडळाला उत्पन्न मिळवून देण्यात प्रामुख्याने चालक व वाहकांचा मोठा हातभार असतो. यामुळे गर्दीच्या हंगामात व दिवाळीत सर्वच बस प्रवाशांनी भरून जातात. उलट जास्तीच्या फेऱ्यांचे नियोजन करून त्यावर चालक व वाहकांची ड्यूटी लावली जाते. चालक व वाहकांचा दिवस प्रवासाच्या वेळापत्रकानुसार ठरतो. दिवाळीच्या दिवशीही बस घेऊन मार्गावर निघावे लागते. प्रवाशांना त्यांच्या गावी व इच्छितस्थळी पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडताना अनेकांना स्वतःच्या कुटुंबासोबत सण साजरा करता येत नाही. बसमध्ये प्रवाशांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न कर्मचारी करतात. असाच आजच्या दिवाळीचा उत्सव चालक– वाहकांसाठी ठरला.
-----
इन्फो
प्रवाशांच्या आनंदातच दिवाळी
दिवाळीच्या दिवशी प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे समाधान एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे असते. स्वतःचा सण बाजूला ठेवून हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी कर्मचारी रस्त्यावर असतात. घराघरांत दिव्यांची रोषणाई होत असताना बसमधून प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा हीदेखील दिवाळीच्या आनंदाचा एक महत्त्वाचा भाग ठरते.
–––––––––
कोट
दिवाळी असली तरी कर्तव्य बजाविण्याचे काम आम्ही दरवर्षी करतो. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आमची सेवा असते. परंतु, परिवारासोबत दिवाळी साजरा करण्याचा आनंद आम्हाला मिळत नाही. अनेकदा दिवाळीच्या दिवशीच बाहेरगावी मुक्कामीही राहावे लागते.
- नंदलाल पाटील, बसवाहक.