India Post
sakal
जुने नाशिक: विदेशात राहणाऱ्या आप्तस्वकीयांपर्यंत मायेचा दिवाळी फराळ पोहोचावा यासाठी टपाल विभागाकडून दिवाळी पार्सल सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. दोनशेहून अधिक कुटुंबीयांनी याचा लाभ घेतला. त्यातून मिळालेल्या उत्पन्नामुळे टपाल विभागाच्या महसुलात वाढ झाली आहे. महिनाभरात सुमारे दहा लाखांहून अधिक महसूल टपाल विभागास प्राप्त झाला.