Diwali Festival: यंदा आतषबाजीला महागाईची झळ!; फटाक्यांच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ

Firecracker shops set up on the occasion of Diwali.
Firecracker shops set up on the occasion of Diwali.esakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : दिवाळीला काही दिवस शिल्लक आहेत. दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईची झळ बसणार आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किमतीत जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने यंदा सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. (Diwali Festival 2022 30 percent increase in price of firecrackers Nashik Latest Marathi News)

पिंपळगावच्या आठवडे बाजाराच्या मैदानात दर वर्षी फटाक्याची दुकाने लागतात. यंदाही लगबग सुरू आहे. लवकरच ही दुकाने थाटली जातील. शहरात फटक्यांचे काही विक्रेते असून, त्यांनी विक्री सुरू केली आहे. काही दिवसांत नागरिकांमधील उत्साह लक्षात घेता फटक्यांची विक्री वाढून मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

यंदा सुतळी बॉम्ब, बुलेट बॉम्ब, लवंगी आदी आवाजाच्या फटाक्यांबरोबरच फुलझड्या, झाड, चक्री, रॉकेट याप्रकारच्या नामांकित व इतर कंपन्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. या वर्षी फटाका विक्री व्यवसायाला दरवाढीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.

Firecracker shops set up on the occasion of Diwali.
Diwali Festival 2022 : दिवाळी खरेदीसाठी शहरात गर्दीच गर्दी!

यामुळे किमतीत वाढ

फटाके निर्मीतीसाठी बेरियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, ॲल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्च्या मालाचा वापर केला जातो. यंदा यापैकी अनेक वस्तूंच्या किमतीत २० टक्क्यांपर्यत वाढ झाली आहे. शिवाय कामगारांची वाढलेली बेसुमार मजुरी तसेच डिझेल-पेट्रोलच्या किमतीतील सततच्या वाढीमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च, विजेचे वाढलेले दर या सर्व बाबींमुळे फटाक्यांच्या किमती वाढल्या आहेत.

"दोन वर्षे कोरोनामुळे फटके खरेदीला नागरिकांनी अपेक्षीत प्रतिसाद दिला नाही. यंदा निर्बंधमुक्त दिवाळी असल्याने फटाके विक्रीत वाढ होईल, अशी अपेक्षाा आहे. पण तीस टक्के दरवाढ व्यवसायाला फटाका बसू शकतो."

- शरद सूर्यवंशी, गणेश निकम (मातोश्री फायरवर्क्स, पिंपळगाव बसवंत)

Firecracker shops set up on the occasion of Diwali.
SAKAL- NIE : कल्‍पकतेतून साकारले रंगबिरंगी आकाशकंदील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com