SAKAL- NIE : कल्‍पकतेतून साकारले रंगबिरंगी आकाशकंदील!

Workshop by SAKAL- NIE
Workshop by SAKAL- NIEesakal

नाशिक : आगामी दिवाळीसाठी आकाशकंदील साकारताना कात्रीने कागद कापत, तर कधी दुमडत अन्‌ चिटकवत, कधी नक्षी काढत, तर कधी लेसने सजावट करताना चिमुकले तल्‍लीन झाले होते. औचित्‍य होते ‘सकाळ-एनआयई’ आणि सागर क्‍लासेसतर्फे झालेल्या ‘चला, आकाशकंदील बनवू या’ या अनोख्या कार्यशाळेचे. अशोक स्‍तंभ येथील सागर क्‍लासेसच्‍या सभागृहात झालेल्‍या कार्यशाळेला चिमुकल्‍यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागींनी आपल्‍या कल्‍पकतेचा पुरेपूर वापर करून रंगबिरंगी आकाशकंदील साकारले होते. (SAKAL NIE workshop colorful sky lantern made from imagination Nashik Latest Marathi News)

esakal

कार्यशाळेच्‍या उद्‌घाटनास सागर क्‍लासचे संचालक सुनील रुणवाल, शोध करिअर इन्‍स्‍टिट्यूटचे संचालक आकाश ठोंबरे, ‘सकाळ’चे सहाय्यक व्‍यवस्‍थापक (वितरण) अभिजित गरुड, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा हिरे, कार्यशाळेतील प्रशिक्षिका व निवृत्त शिक्षिका प्रज्ञा जोशी आदी उपस्‍थित होते.

मान्‍यवरांच्‍या मार्गदर्शनानंतर सहभागी चिमुकल्‍यांनी आकाशकंदील साकारायला सुरवात केली. वेगवेगळ्या रंगांचे कागद (कार्डशीट) विद्यार्थ्यांना दिले होते. सहभागींनी स्‍वतःसोबत आणलेल्‍या कात्री, डिंक व अन्‍य साहित्यांचा वापर करून आकाशकंदील साकारले. प्रज्ञा जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून टप्प्‍याटप्प्‍याने कृती सांगितली. त्‍यानुसार सहभागी आकाशकंदील साकारत गेले.

कार्यशाळेसाठी श्री याज्ञवल्‍वय शैक्षणिक संस्‍था संचालित शोध करिअर इन्‍स्‍टिट्यूटचे विशेष सहकार्य लाभले. सहभागींना पेपर किट देताना भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन देण्यात आले. कार्यशाळेसाठी शुभम चिखले, स्वामिनी जाधव, तनुजा चौधरी, तन्वी देशपांडे, गायत्री कात्रे, गायत्री गायकवाड, वेदिका महाले, खुशाल सपकाळ, आदित्य बोखारे, सोहम परदेशी, ओमकार पगार, तनिष्क रिकामे, हर्षवर्धन मोरे, रमिज सय्यद, नकी सय्यद, लक्ष मेहता, सार्थक गोडसे, भावेश देवरे, राजवीर नरुक्का, नमन गिते आदींनी परिश्रम घेतले.

प्रारंभी श्री. गरुड यांनी ‘सकाळ’च्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थ्यांनी उज्‍ज्‍वल भविष्यासाठी वाचनावर भर देण्याचे आवाहन केले. प्रज्ञा पाटील यांनी मान्‍यवरांचा सत्‍कार केला. सकाळ-एनआयई समन्‍वयक मनोहर शिंदे यांनी सूत्रसंचालन व संयोजन केले.

Workshop by SAKAL- NIE
Nashik : निसर्गाच्या सानिध्यात अनुभवली रम्य ‘सकाळ’!
esakal

घरी आकाशकंदील उभारण्याचा निर्धार

सहभागींपैकी अनेकांनी सुरेख आकाशकंदील साकारले. वेगवेगळ्या रंगसंगती व नक्षीचा वापर करून विद्यार्थ्यांनी आकाशकंदील बनविले. यंदाच्‍या दिवाळीत आपण बनविलेले कंदीलच घरी उभारणार, असा निर्धार विद्यार्थ्यांनी या वेळी केला.

पालकांकडून प्रोत्‍साहन

सहभागी चिमुकल्‍यांचा उत्‍साह वाढविताना पालकांनी प्रोत्‍साहन दिले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून आकाशकंदील बनविताना व पूर्ण झाल्‍यावरदेखील व्हिडिओ, छायाचित्रे टिपताना आनंदभाव व्‍यक्‍त करण्यात आला.

सामाजिक उपक्रमांना नेहमीच बळ : रुणवाल

श्री. रुणवाल म्‍हणाले, की ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. विशेषतः विद्यार्थ्यांच्‍या जडणघडणीसाठी राबविलेल्‍या जाणाऱ्या उपक्रमांना नेहमीच बळ देत राहणार आहे, असे आश्‍वासन त्‍यांनी दिले. लोकाभिमुख, समाजाभिमुख उपक्रमांचे कौतुक करताना भविष्यातही या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यशाळेतील क्षणचित्रे...

* सहभागी चिमुकल्‍यांमध्ये अमाप उत्‍साह

* तीन गटांत, तीन वेगवेगळ्या आकार, नक्षीच्‍या कंदीलचे प्रशिक्षण

* सहभागींनी कल्‍पकता वापरत आकाशकंदीलची केली सजावट

* शेवटच्‍या मिनिटापर्यंत कंदील बनविण्याची लगबग

* आकर्षक कंदील साकारणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप

* सजावटीवर अनेकांचा विशेष भर, लेसचा वापर

Workshop by SAKAL- NIE
Nashik : सुंदर- स्वच्छ नाशिक, मात्र मंदिरे दुर्लक्षित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com