Diwali Festival 2022 : दिवाळी फराळातून बचतगटांना रोजगाराची संधी! | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women of Sanskriti Gram Sabha Savings Group packing snacks.

Diwali Festival 2022 : दिवाळी फराळातून बचतगटांना रोजगाराची संधी!

नाशिक : दिवाळी फराळ, साहित्‍य बनवून बचतगटातील अनेक गरजू महिलांना रोजगार मिळाला आहे. यात महिलांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदवून फराळ साहित्‍य बनविण्यात तसेच पॅकिंग करण्यात महिला मग्‍न आहेत. (Diwali Festival 2022 snacks provide employment opportunities to women saving groups Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Diwali Festival 2022 : दिवाळी खरेदीसाठी शहरात गर्दीच गर्दी!

प्रेरणा, स्वयंसिद्धा व कल्‍याणी आदी बचतगट मिळून १०० ते १५० महिला दिवाळीसाठी आलेल्‍या ऑर्डरची पूर्तता करण्याकरिता व्यस्त आहेत. यात कल्‍याणी पथसंस्‍था अंतर्गत बचतगटातील महिलांना मुंबईतील कंपनीची ऑर्डर मिळाली आहे. ग्रामीण स्‍तरावरील संस्‍कृती ग्रामसंघ महिला बचतगटात १२० महिलांचा सहभाग आहे.

संस्‍कृती ग्रामसंघ बचतगटाकडून फराळाच्या पदार्थ प्रत्‍येकी ५०० किलोप्रमाणे तयार करण्‍यात आले आहेत तसेच विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत. बचतगटातील महिला या स्वतः साहित्‍य खरेदी करून नंतर त्‍या गरजेप्रमाणे त्‍यांची स्‍वच्छता करून फराळाचे पदार्थ तयार करतात. अशाप्रकारे दिवाळीत गरजू महिलांना फराळाच्या पदार्थातून रोजगार उपलब्‍ध होत आहे.

तसेच नोकरदार महिला वर्ग यांच्याकडून फराळाच्या पदार्थांना मागणी जास्‍त प्रमाणात असते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन फराळाचे पदार्थ बचतगटाकडून तयार केले जात आहेत. तसेच संस्‍कृती ग्रामसभा बचतगटाकडून अगदी माफक दरात फराळाचे पदार्थ उपलब्‍ध करून दिले जात आहे. तसेच दिवाळीच्या आठ दिवस अगोदरच तयार माल बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्‍ध आहे.

हेही वाचा: Diwali Festival: यंदा आतषबाजीला महागाईची झळ!; फटाक्यांच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ

फराळ पदार्थ व दर

चकली ६०० ग्रॅम: १२०/– रुपये
अनारसे ६०० ग्रॅम :१२०/– रुपये
नानकटाई ६०० ग्रॅम :१२०/– रुपये
म्‍हैसूरपाक ६०० ग्रॅम : १२०/– रुपये
अनारसा पीठ २२० रुपये किलो
नाशिक चिवडा १ किलो १२० रुपये
लसूण, तिखट, साधी शेव १ किलो १२० रुपये
गोड/तिखट शंकरपाळी १ किलो १२० रुपये
करंजी १ किलो १२० रुपये

हेही वाचा: Diwali Special : Weekendचे औचित्य साधत खरेदीसाठी उसळली तोबा गर्दी