Diwali Festival Business: दिवाळीत RTOला 8 कोटींचा धनलाभ! ऑटोमोबाइल क्षेत्राला झळाळी

Diwali Car Shopping
Diwali Car Shoppingesakal

पंचवटी : सणासुदीत नागरिकांचा वाहन खरेदीकडे अधिक कल असतो. त्यात दिवाळी म्हटल्यावर वाहन खरेदीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच यंदा दिवाळीच्या पाच दिवसांत प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) तब्बल आठ कोटींहून अधिकचा धनलाभ झाला आहे.

यामुळे एकीकडे आरटीओला कोट्यवधी रुपयांचा महसूल, तर दुसरीकडे ऑटोमोबाइल क्षेत्राला मोठी झळाळी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Diwali Festival Business 8 Crores to RTO in Diwali boom in automobile sector nashik)

दिवाळीच्या पाच दिवसांत नव्या दुचाकी, चारचाकी, माल वाहतूक, तीनचाकी, प्रवासी, खासगी ओमनी बस व इतर अशा एकूण १, ६८२ वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यातून प्रादेशिक परिवहन विभागाला ८ कोटी ६१ हजार ८७२ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी, परवाना, नूतनीकरण, लायसन्स, व्यवसाय व पर्यावरण कर या माध्यमातून महसूल जमा होत असतो. वर्षभरात सर्वाधिक महसूल हा दिवाळीनिमित्त होणाऱ्या वाहन विक्रीतून होतो.

यामुळे ऑटोमोबाइल क्षेत्राची अर्थचक्र चांगलीच रूळावर येतात. या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत नागरिकांचा वाहन खरेदीकडे कल वाढला आहे. वाहन खरेदीसाठी फायनान्स कंपन्या व बँका अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांना फायदा होत आहे.

दीपावलीच्या कालावधीत वाहन खरेदी करताना संबंधित वाहन विक्रेते विशेष सवलत देत असल्याने दुचाकी -चारचाकी खरेदी जोरात असते. त्यामुळेच यंदाची दिवाळी ऑटोमोबाइल क्षेत्राला लाभदायक ठरली असून, वाहनांची विक्री विक्रमी झाली आहे.

Diwali Car Shopping
District Onion-Potato Union Election: कांदा-बटाटा संघासाठी 31 डिसेंबरला मतदान! पहिल्याच दिवशी 39 अर्जांची विक्री

दुचाकींची खरेदी सर्वाधिक

आरटीओकडे यंदा नव्या बस १, बांधकाम निगडित वाहन ४, मालवाहतूक ९१, दुचाकी १०३९, मोटार कॅब १, चारचाकी ५२६, खासगी ओमनी बस २, माल वाहतूक तीनचाकी १, खासगी प्रवासी वाहतूक १६ अशा एकूण १ हजार ६८२ वाहनांची नोंद झाली. यातून आरटीओला जवळपास ८ कोटी ६१ हजार ८७२ रुपयांचा धनलाभ झाला आहे.

"केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व सुविधा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. अगदी लर्निंग परवान्यापासून ते वाहन नोंदणीपर्यंत सर्वच कामे सुलभ झाली आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नागरिकांना आता कार्यालयात चकरा माराव्या लागत नाही. तसेच, महसूल वाढीसाठी आरटीओकडून सतत विविध उपक्रम राबविले जात असतात. त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून एकत्रित प्रयत्न केले जातात. त्याचेच फलित यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीतून समोर आले आहे."

- प्रशांत देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक.

Diwali Car Shopping
Maha Shiv Puran Katha: मतांच्या राजकारणासाठी संस्कृतीचे विभाजन : पंडित प्रदीप मिश्रा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com