Diwali Festival: आयात घटल्याने फटाके दरांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ; मागणीदेखील वाढणार | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crowd of citizens to buy firecrackers.

Diwali Festival: आयात घटल्याने फटाके दरांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ; मागणीदेखील वाढणार

जुने नाशिक : पर्यावरणपूरक फटाक्यांनी यंदाची दिवाळी साजरी होणार आहे. तसेच, दोन वर्षानंतर दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे सर्वांसाठी ही दिवाळी विशेष असणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाके विक्री दुप्पट वाढण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविण्यात आली आहे. महागाईमुळे फटाक्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे फटाक्यांची आयात घटल्याने दरांमध्ये सुमारे ४० टक्केने वाढ झाल्याचेही सांगण्यात आले. (Diwali Festival Firecrackers prices up 40 per cent on fall in imports Nashik Latest News)

गेली दोन वर्ष कोरोनामुळे दिवाळी साध्या पद्धतीने घरातल्या घरात साजरी करावी लागली. फटाके फोडण्याचा आनंदापासून वंचित राहावे लागले. या वर्षी परिस्थिती सामान्य असल्याने निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. अशा परिस्थितीत फटाक्यांची मागणीदेखील वाढणार आहे. फटाके फोडण्याचा दोन वर्षाचा आनंद या वर्षी घेण्यात येणार आहे. यामुळे फटाके विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांच्याकडून फटाके स्टॉल उभारणीस सुरवात झाली आहे. डोंगरे वस्तीगृहावर तर स्टॉल उभारून फटाक्यांचा मालही उपलब्ध झाला आहे. फटाक्यांची यंदाची विशेषतः म्हणजे हवा आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेत फटाके तयार करणाऱ्यांनी पर्यावरणपूरक फटाके तयार केले आहे.

फटाक्यांतील नावीन्य

लवंगी, लक्ष्मी फटाके, भुई चक्कर, सुरसुरी, सुतळी बॉम्ब हे पारंपारिक प्रकार आहे. यंदा मात्र नावीन्यपूर्ण फटाके देखील आले आहेत. आकाशात उडून झगमग करणारे ड्रोन फटाके, क्रुकलीन करणारे तसेच फटाके फुटल्यानंतर विविध रंगी प्रकाश पडणारे फॅन्सी फटाके प्रथमच बाजारात दाखल झाले आहे.

हेही वाचा: Success Story : शेतमजूर हिराबाई बनल्या दुमजली मॉलच्या मालकीण!

असे आहेत दर

फटाके प्रकार दर

सुरसुरी १० ते २००

लवंगी फटाके १५० बॉक्स

झाड ८० ते ६००

भुईचक्कर ६० ते ४५०

लक्ष्मी बॉम्ब ३० रुपये पॅकेट

रॉकेट ६० ते ४००

फॅन्सी फटाके १०० ते २ हजार

टिकली रोल ८० रुपये

"दुकानदारांनी शंभर टक्के बुकिंग केली आहे. बुकिंग आणि नागरिकांतील उत्साह बघता बाजार चांगला असेल. दराचा विचार केला तर ४० टक्के दर वाढ झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात किरकोळ विक्रेत्यांचे दुकान सजतील. प्रतिसाद चांगला राहिल्यास मागील नुकसान भरून निघेल." - पंकज काळे, सेक्रेटरी, नाशिक फटाका असोसिएशन

"४० ते ५० टक्के फटाके विक्री वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. प्रत्यक्षात दिवाळी कशी जाते, याकडे नजरा टिकून आहे."

- सचिन पटणी, उपाध्यक्ष, नाशिक फटाका असोसिएशन

हेही वाचा: PFI Case : राममंदिर पाडून पुन्हा बाबरी उभारण्याचा डाव!

टॅग्स :Diwali FestivalNashik