fireworks ban
sakal
नाशिक: आनंदपर्व दिवाळी सणात रात्री दहा ते पहाटे चार या कालावधीत फटाके वाजविण्यावर बंदी असणार आहे. फटाके विक्री व वापराबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (ता. १४) आदेश काढले. फटाके फोडण्याबाबत त्यात मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.