नाशिक- उन्हाचा वाढता पारा आणि शिगेला पोहोचलेली ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या अंतिम सामन्याची उत्कंठा, क्षणोक्षणी बदलणारी स्थिती अशा संमिश्र वातावरणात रविवारी (ता. ९) नाशिककरांनी घरात व हॉटेलमधील मोठ्या पडद्यावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचा आनंद लुटला.